मिहिका
मिहिका अनघा sss अनघाsss आईचा आवाज ऐकून अनघा जागी झाली. किती ग बाळा उशीर, किती आवाज द्यायचा ग तुम्हा मुलांना, आले ग म्हणतेस आणि नुसती पसरतेस ... चल बरं पांघरुणाची घडी घाल आणि ये जरा इकडे आई परत आपल्या कामाला लागली. पांघरूनातून अनघा आईकडे बघत होती. किती काम करते ही सकाळपासून... सर्वांची काळजी, बाबांचा डबा, नाश्ता, दादाचा डबा ,माझा डब्बा सर्वांचे जेवण नंतर आवरणं कंटाळा येत नसेल का कधी तिला! अनघा हळूच उठली आणि आईला मागून जाऊन मिठी मारली. मम्मा वूमन्स डे च्या शुभेच्छा! आज काय ग अनघा एवढी लाडात आलीस आईच्या शब्दाने अनघा एकदम चमकलीच हिला कसं कळतं आमच्या मनातलं ? अग मम्मा आज वुमन्स डे ना मग तो सेलिब्रेट करायचा, वूमन्स डे निमित्त आम्ही सर्व पार्टी करणार आहोत ,मस्त डान्स करणार, छान पैकी हॉटेलमध्ये जेव...