मिहिका

                 मिहिका 
                अनघा sss  अनघाsss आईचा 
आवाज ऐकून अनघा जागी झाली. किती ग बाळा उशीर, किती आवाज द्यायचा ग तुम्हा मुलांना, 
 आले ग म्हणतेस आणि नुसती पसरतेस ... चल बरं पांघरुणाची घडी घाल आणि ये जरा इकडे 
आई परत आपल्या कामाला लागली.
               पांघरूनातून अनघा आईकडे बघत होती. किती काम करते ही सकाळपासून... सर्वांची काळजी, बाबांचा डबा, नाश्ता, दादाचा डबा ,माझा डब्बा सर्वांचे जेवण नंतर आवरणं कंटाळा येत नसेल का कधी तिला!
               अनघा हळूच उठली आणि आईला मागून जाऊन मिठी मारली. मम्मा वूमन्स डे च्या शुभेच्छा! आज काय ग अनघा एवढी लाडात 
आलीस आईच्या शब्दाने  अनघा  एकदम  चमकलीच  हिला कसं कळतं आमच्या मनातलं ? अग मम्मा आज वुमन्स डे ना मग तो सेलिब्रेट 
करायचा, वूमन्स डे निमित्त आम्ही सर्व पार्टी करणार आहोत ,मस्त डान्स करणार, छान पैकी हॉटेलमध्ये जेवण करनार खूप मजा आणि मस्ती
 करणार,
                आई गालातल्या गालात हसली आणि म्हणाली अगं तुम्ही किती पार्ट्या करता आज हे आहे, उद्या ते आहे , अजून काय बर
 आहे. तुम्हाला फक्त निमित्त पाहिजे, बोअर झाले म्हणून पार्टी बापरे बाप ! आणि आई पोळ्या करायला लागली.
              अनघा म्हणाली तुला नाही वाटत का ग कधी आपल्याला स्वयंपाकातून सुट्टी मिळावी. रोजचे रोज तेच रहाटगाडगे,  कमीत कमी आजच्या दिवशी तर बाबांना सांग, मी पण नोकरी करणार, मी स्वयंपाक नाही बनवणार तुमचं तुम्ही बघा !स्त्री-पुरुष समानता असायला हवी.
               अनघाचे शब्द ऐकले आणि आई एकदम शांत झाली. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मला पहिले पासून स्वयंपाक आणि विविध पदार्थ बनवण्याची हौस आहे.
 त्यामुळे मी यालाच माझा जॉब समजते. तुम्हा सर्वांच्या चेहर्‍यावर जी खुशी, आनंद समाधान  दिसते ना ते माझ्या जॉब चे रोजचे प्रमाणपत्र.                       कदाचित फोटो काढून भिंतीला चिपकवण्या सारख्या  लेखी  डिग्र्या  नसतील  माझ्याकडे ,पण तुमच्या समाधानी चेहऱ्याच्या रोजच्या रोज  चमकणाऱ्या भरपूर समाधानाच्या डिग्र्या आहेत माझ्याकडे ! 
                 तुमचं तुम्ही बघा  हे फक्त बाबांनाच का?  तुम्हासाठी पण लागू पडतं ना! आईच्या या 
उत्तरामुळे अनघा एकदम विचारात पडली. मग तुला असं नाही वाटत का आपणही पैसे कमवावे आपल्याला वाटेल तिकडे फिरावे. पार्ट्या कराव्यात, समान हक्क असायला पाहिजे.
              आई मात्र आता हसून म्हणाली पैसे कमावले म्हणजे समान हक्क असतो का गं !आणि पैशाने सुख आणि समाधान विकत मिळते?  आता मात्र अनघा या शब्दाने विचारात पडली, आई म्हणाली अगं मला स्वयंपाक घरकाम करून खुशी मिळते ते मी करते. प्रत्येकाला जे आवडेल ते त्याने करावे, आणि आमच्या संसारात न तुझ्या बाबांनी मला मी गृहिणी आहे म्हणून कधीही कमी लेखले नाही. ते मला अन्नपूर्णा समजतात, आणि त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा दिली आहे. प्रत्येक पैशाचा हिशोब ते मला सांगतात, समजवतात आणि आमच्या संसारात आम्ही दोघं मिळून सर्व निर्णय घेतो. मग कशाचा समान हक्क आणि कशाचा वुमन्स डे ग !माझ्या आयुष्यात रोजच वुमन्स डे
असतो. आणि आता मात्र आई आणि अनघा दोघेही खळखळून हसायला लागल्या.
                बाहेरून बाबांचा आवाज आला अनघा.., अनघा मी आज मस्तपैकी बाजूचे टपरी वरून गरमा गरम भजे आणि  आईच्या आवडती काजुकतली पण आणली आहे. आज वुमन्स डे ना ,आणि ते सर्व खळखळून हसायला  लागले.इतक्यात दादा पण आला.आई तुला ती ब्रँडेड पर्स आवडली होती ना! ती आणली मी तुझ्यासाठी, तुला वूमन्स डे च्या खूप खूप शुभेच्छा आणि ती चौघेही खळखळून हसायला लागली लागली.
                     सौ. ज्योती सुनील 

             

Comments

Popular posts from this blog

डिलीट

ठेव ‌मर्मबंधातली

स्वामी आनंदाचा