स्वामी आनंदाचा
मावशी आम्हाला विसरू नका.........
अदितीच्या कानामध्ये रोज आवाज गुंजन घालीत होता. कोण बरं ही मुले! काय नातं त्यांच आणि माझं.... सारखा सारखा हा आवाज कानात गुंजतो ........
पण आज मात्र अचानक सर्व मुले भोवती जमा झाली . आदितिच्याभोवती रुंजी घालू लागली.........
मावशी आपण गेम खेळू..... गेम खेळू आणि अधिकार वाणीने आदितीला ओढु पण लागली त्याबरोबर अचानक आदिती झोपेतून जागी झाली.........,. किती अधिकाराने ही मुले मला आवाज देत आहे ना! माझं मन किती गुंतलं न या मुलांमध्ये आज मात्र या मुलांना भेटायला जायचेच ....... आदितीने दृढनिश्चय केला ....
मुलांना भेटायला जायचेच.........
आठ महिन्यांपूर्वी आदिती या मुलांना भेटली होती. दिवाळीनिमित्त सर्व मुलांना घरी आणले होते कोण होती ही मुलं "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं"
बापा विन जगणारी लहान वयातच मोठी झालेली गोंडस फुलपाखरं........... भविष्याची स्वप्न रंगवन्याआधिच दुःखाच्या पडद्याआड लपलेली निरागस मुले!
परिस्थितीने गांजलेली संस्कारक्षम मुले आदितीने सर्वांना आपल्या घरी "एक दिवस आनंदाचा" म्हणून आणले होते. दहा ते बारा वयोगटातील ही मुले आनंदाने कसे जगायचे शिकवत होते.
अदितीने स्वतःची ओळख मी तुमची मावशी, हे मावशीचे घर असे म्हणून मुलांना ओळख करून दिली. आज आपल्याला खूप खूप खेळायचे आहे, मस्ती करायची, आवडीचे जेवायचे, याची जाणीव आदितीने मुलांना करून दिली. मुलं खूप खुश झाली.
मुलं घरी आल्यानंतर आधी तिने मुलींचे स्वागत कुमारी पूजनाने केले.
नवरात्रातल्या अष्टमीसारखे............
मुलांचे कुमार पूजन, एक आगळीवेगळी
स्वस्थापित प्रथा मुले खुश झाली. मस्त गेम सुरु झाला गाण्याच्या भेंड्या व इतर गेम.........
मुलं खूप जुनी ओळख असल्यासारखी वागायला लागली. आपले दुःख विसरून घरात मिसळुन गेली. त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून आदितीचे मन आनंदाने भरून आले. कसे इवल्याशा मुलांना वाऱ्यावर सोडून वडिलांनी आत्महत्या केली असेल?..........
कीती निरागस चेहरे ,मुलांचे भवितव्य! का याचा विचार केला नसेल........
दुपारी मुलांना त्यांच्या आवडीची इडली चटणी देण्यात आली आईस्क्रीम बद्दल विचारले तेव्हा कोणी कोण, कोणी चोकोबार,याची मस्त ऑर्डर दिली. टीव्हीवरचा कॉमेडी शो बघत बघत मुलांनी सर्व फस्त केले......... आदिती मात्र मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ,मस्ती त्यांची निरागसता निरखत होती आज आनंदाची व्याख्या पूर्ण बदलून गेली होती. काय नव्हते तिच्या जवळ पैसा गोंडस मुले सुंदर संसार प्रेम करणारा नवरा ,पण मिळणाऱ्या सुखसोयी पेक्षा हा आनंद अव्यक्त होता.
आज मात्र तिला आनंदाची व्याख्या गवसली होती. तिचा आनंद गगनाला स्पर्शुन जात होता. मावशी तुम्ही आम्हाला जसे वागवले ना तसे आम्हाला आज पर्यंत कोणीच वागवले नाही या वाक्यामुळे.......... आदिती तंद्रीतून बाहेर आली एक दिवसाच्या घरपणात आदिती चे मुलांशी, मुलांचे आदिती शी अतूट भावनिक प्रेमबंध निर्माण झाले........
परतण्याची वेळ झाली पण मुलांचा पाय बाहेर निघेना........ .परत होस्टेलला जाण्याची मुलांची अजिबातच इच्छा नव्हती. पण त्यांना जावे लागणार होते. अत्यानंदाने तृप्त झालेली मुले........ आदिती शी एक भावनिक नाते जळूवुन गेले......... मुलांना जातांना बघून आधी तिचा चेहरा मात्र केविलवाना आणि उदास झाला.
परत कधी भेटतील ही मुले देवाघरची फुले मुलांचे चेहरे आदिती मावशीला खुणावत होते............... मावशी आम्हाला विसरू नका.
Khup mast very touching
ReplyDelete