ठेव ‌मर्मबंधातली

             आज सर्व मैत्रिणी वसुधाकडे जाणार होत्या. कारणही तसेच.... वसुधा म्हणजे आनंदाचा हास्याचा झरा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद साजरा करणारी,मैत्रीणीना चिडवनारी हसवणारी, सतत खोड्या करणारे मस्तीखोर फुलपाखरू.

           पण आजचे कारण वेगळेच होते.वसुधाच्या मिस्टरांना जाऊन ८ ,१० दिवस झाले होते.म्हणुन सर्व मैत्रीणी तिला भेटायला निघाल्या होत्या. वसुधाला धीर देण्यासाठी इकडल्या तिकडल्या गोष्टी सुरू झाल्या.वसुधा मात्र अतिशय उदासपने खिन्न मनाने बसुन होती.

अचानकपणे दिपालीचे लक्ष वसुधाच्या गळ्याकडे गेले.तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते,ते बघुन दिपालीला वाईट वाटले.तिने प्रश्न केलाच अग मंगळसूत्र कुठे आहे.त्याबरोबर घरातील महिला मंडळींची कुजबुज सुरु झाली.

  दिपाली काय समजायचे ते समजली.तिने कोणालाही न दुखवता मंगळसूत्राबद्दल माहिती सांगितली . मंगळसुत्रातील दोन वाट्या म्हणजे शिव आणि शक्तीचा सुरेख संगम..या वाट्यांना गुंफणारे तार आणि काळे मणी म्हणजे विश्र्वास! माहेरची वाटी हळदीची आणि सासरची वाटी कुंकवाची या दोनहि कुटुंबांना एकत्र गुंफणारे नातेसंबंध म्हणजे काळे मणी.आणि जे आपल्या अंतापर्यंत सांभाळून ठेवायचे आहे.

              हिंदुधर्मानुसार आपण जन्मल्यापासुन आपल्यावर जे सोळा संस्कार होतात त्यातील विवाह हा पंधरावा संस्कार. पतीच्या निधनानंतर विधिवत झालेले, विवाह संस्कार बदलत तर नाही ना? मग मंगळसूत्र न घालण्याचे बंधन कशाला....

   सांगा मैत्रीणींनो आपल्याला काय वाटते.....





Comments

  1. Sundar मार्मिक कथा

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  3. Hindu sanskruti aani aapan ,, nanapariche loka,

    ReplyDelete
  4. He sagle change zale pahije,कोणतीही बंधने नसावीत

    ReplyDelete
  5. Alolika Sontakke:
    खूप हृदयस्पर्शी
    काही रुढी परंपरा बदलल्या पाहिजेत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डिलीट

स्वामी आनंदाचा