डिलीट
घाईघाईने काम आवरत अनुश्री ने घड्याळाकडे बघितले बापरे आज खूपच उशीर झाला . अनुश्री ची रोजची सवय सकाळी पेपर वाचन आणि व्हाट्सअप ची पण आज नवऱ्याची सकाळची शिफ्ट आणि मुलांची ट्रिप, त्यामुळे सकाळी वेळच मिळाला नाही. व्हाट्सअप बघते तर काय सकाळी सकाळी 100 मेसेजेस! अरे बापरे आज तर मधुराचा वाढदिवस विसरलीच की मी , किती शुभेच्छा किती केक प्रत्येकाचे आपापले व्हिडिओ.आपण तर अजून शुभेच्छा पण नाही दिल्या आणि अनुश्रीला राहवले नाही तिने पटापट शुभेच्छा केक मधुराला पाठवले .आता थोडे तिला शांत वाटले समाधान वाटले.
मग मात्र विचारांची शृंखला सुरू झाली खरंच का इतके केकचे फोटो, शुभेच्छांचे फोटो, व्हिडिओ पाठवने जरुरी आहे? किती हा दिखावा प्रत्येकाची जणू चढाओढ सुरू झाली आमची किती मैत्री आमचे किती प्रेम आणि तिचे तिलाच हसू आले. मीसुद्धा तर या भाऊगर्दीत इतकीच सामील झाली.आणि ती स्वत:च्याच
मनाशी हसली. पाठ फिरताच मधुराला नाव ठेवणाऱ्या सुद्धा आज तितक्यात उस्फूर्तपणे शुभेच्छा देत होत्या.
खरंच जुन्या गोष्टी विसरून त्या मैत्रिचा नवीन सूर्योदय करीत होत्या ?
असे मात्र दरवर्षी होते, तो दिवस संपला की परत ये रे माझ्या मागल्या! इतक्या भावना दर्शवणे जरुरी आहे का? तिने स्वत:च्या मनाला प्रश्र्न विचारला. थोडक्या मध्ये शुभेच्छा दिल्या तर जमणार नाही का!
मला वाटते फोटो केक खूप न पाठवता आपले विचार बदलणे गरजेचे आहे कारण मैत्रीमध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे . शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मैत्रीच्या नात्याच्या रोपट्याला विश्वासाचे खतपाणी घालून हे रोपटे मनात खूप खोलवर रुजवणे महत्वाचे.
आणि मग जेव्हा आपण मैत्रिणींच्या सुख दुःखात सामिल होऊन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तो प्रत्येक दिवस मैत्रिणीचा वाढदिवस.
अनुश्री स्वतःच्या मनाशी हसली आणि तिने एक एक केक ,फोटो डिलीट करायला सुरुवात केली .
"प्रिय मधुरा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला भरभरून शुभेच्छा" आणि आता मात्र अनुश्री ने आत्मविश्वासाने शुभेच्छा दिल्या आणि ती मनाशीच हसू लागली.
खरंच , खुप सुंदर
ReplyDeleteछान लिहले ग.मैत्रीमध्ये नेहमीच विश्वास संपादन करता आला पाहिजे
ReplyDeleteखूप खर लिहिलंय tu, देखाव्या
ReplyDeleteपेक्षा भावना महत्वाच्या
Khupach sunder lihalay👌👌apratim
ReplyDelete